वंजारी सेवा संघ महिला आघाडी वर्धा जिल्हाध्यक्षापदी सौ सुस्मिता आखाडे यांची निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 Nov 2022, 9:42 AM
हिंगणघाट (किशोर मुटे) : वंजारी सेवा संघाची संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष श्री राहुलजी जाधवर वंजारी सेवा संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माननीय मंजुषाताई दराडे यांच्या मार्गदर्शनात व पूर्व विदर्भ अध्यक्ष श्री शेषरावजी खार्डे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष श्री शिवाजी आखाडे व पूर्व विदर्भ सचिव श्री प्रमोद जी मुंडे यांच्या नेतृत्वाने वंजारी सेवा संघ महिला आघाडी वर्धा जिल्हाध्यक्षपदी सौ सुस्मिताताई आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. वर्धा येथे झालेल्या जिल्हास्तरीय समाज बैठकीत सौ सुस्मिताताई आखाडे यांना नियुक्त पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्याध्यक्ष म्हणून सौ. मनीषा साळवे तर सचिव पदी सौ. शितलताई कुटे , तर संघटक म्हणून सौ बरखा बुट्टे यांची निवड करण्यात आली. वंजारी सेवा संघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र घुले व पूर्व विदर्भाचे उपाध्यक्ष श्री शिवाजी आखाडे पूर्व विदर्भाचे सचिव श्री. प्रमोद मुंडे तसेच वंजारी सेवा संघ युवा आघाडीचे अध्यक्ष श्री. राजीव धात्रक, कार्याध्यक्ष श्री. उमेश कापकर व युवा आघाडीचे सचिव श्री. स्वप्नील आखाडे व तसेच सौ. बरखा बुट्टे ,सौ.वनिता घुगे, सौ. नंदा केंद्रे,सौ.शारदा घुले, सौ. सविता मुंडे सौ. शुभांगी मुंडे, सौ. स्वाती मुंडे, सौ. विशाखा कापकर, सौ. कविता काकड, सौ. अनिता घुगे तसेच अनेक वंजारी बांधवे उपस्थित होते. तसेच इतर कार्यकारणी मंडळाची नियुक्ती वंजारी सेवा संघाचे प्रदेश राज्याध्यक्ष राहुलजी जाधवर, पूर्व विदर्भ अध्यक्ष श्री शेषरावजी खारडे यांच्या अनुमतीने करण्याचे ठरविण्यात आले. अशी माहिती विदर्भ विभागीय सरचिटणीस प्रमोद मुंडे यांनी दिली. वंजारी सेवा संघ या संघटनेचा दशकपूर्ती मेळावा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे त्याकरिता वर्धा जिल्ह्यातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
Post Views: 133