अकोला जिल्ह्यातील बारा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड


विज्ञानाच्या विस्तीर्ण व अथांग क्षेत्रामध्ये आपण आपले स्थान निश्चित करा - शिक्षणाधिकारी डॉक्टर मोहरे
 विश्वप्रभात  24 Nov 2025, 10:04 PM
   

इन्स्पायर अवॉर्ड योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण होते त्यामुळे नवप्रवर्तनाची वृत्ती विकसित होते .विज्ञानाच्या विस्तीर्ण व अथांग क्षेत्रामध्ये आपण आपले स्थान अशा प्रदर्शनांमधून निश्चित करू शकता याची मला खात्री आहे असे उद्गार शिक्षणाधिकारी माध्य. डॉ. अरविंद मोहरे यांनी समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट अकोला येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय  इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले असून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाल्यास आपणास भविष्यात चांगल्या संधी मिळू शकतात असे मनोगत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रमोद टेकाडे यांनी यावेळी व्यक्त केले तसेच सुभाष भालेराव उपशिक्षणाधिकारी माध्य., शरद अग्रवाल शाळा समिती सदस्य यांनीही  आपले विचार व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री उमेश बगडिया अध्यक्ष हिंदी गुजराती शिक्षण मंडळ तर शुभहस्ते मा. श्री. डॉ.अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी माध्य. जि प अकोला ,प्रमुख अतिथी मा. डॉ. प्रशांत श्रीवास्तव NIF, मा.श्री प्रमोद टेकाडे मा. श्री सुभाष भालेराव उपशिक्षणाधिकारी माध्य. जि प अकोला, मा. श्री अनिल तापडिया सचिव हिंदी गुजराती शिक्षण मंडळ ,मा. श्री शरद अग्रवाल ,मा. श्री विनोद मानकर जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक, प्रा. डॉ.आनंद अस्वार ,प्रा. डॉ. सुभाष तांडे, प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, श्रीमती ममता चावला प्राचार्य , श्रीमती  पूनम चव्हाण उपप्राचार्य हे मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.          राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन 27 ते 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भंडारा येथे संपन्न होणार आहे या प्रदर्शनाकरता अकोला  जिल्ह्यातून 12 विद्यार्थी निवडण्यात आलेले आहेत--- शाश्वत ठाकरे होली क्रॉस स्कूल अकोला,संस्कृती तिवारी स्कूल ऑफ स्कॉलर्स बिल्ला कॉलनी अकोला, नैतिक गव्हाळे सरस्वती विद्यालय अकोट, विजया पवार शिवाजी विद्यालय मोरगाव काकड, वैष्णवी चुलापार सिद्धेश्वर महाराज विद्यालय तिवसा, अन्वी जायभाये प्रभात किड्स अकोला , गार्गी गर्कल प्रभात किड्स अकोला, श्रुती  तायडे मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय  अकोला , अंजली वरोकार  फ्रीडम इंग्लिश स्कूल अकोट , मोहम्मद अजीम 
अंजुमन अन्वरूल इस्लाम हाय. बाळापुर, उझेर अमास अकिल शेख  शहा बाबू हायस्कूल पातुर, आयुषी गावंडे बाबासाहेब खोटरे विद्यालय शिरसोली. अहवाल वाचन सुभाष भालेराव आभार प्रदर्शन विनोद मानकर तर सूत्रसंचालन सौ आशा भास्कर यांनी केले. प्रदर्शन यशस्वी करण्याकरता जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ व एम बी कॉन्व्हेंटचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,कला शिक्षक संजय आगाशे यांनी अथक परिश्रम घेतले.

    Post Views:  24


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व