नारी ललकारचा दिपावली विशेषांक साहित्य संमेलनात प्रकाशित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Nov 2025, 2:15 PM
   

अकोला :  श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे आयोजित ७वे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रसिद्ध कवी, साहित्यिक, समाज सेवक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार पंजाबराव वर तथा कार्यकारी संपादीका सुनंदा पंजाबराव वर संपादीत नारी ललकार दिपावली विशेषांक २०२५ चे साहित्य संमेलनातील मान्यवरांकडून प्रकाशित करण्यात आले. साहित्यिकांनी विशेषांकाचे कौतूक केले. राज्यस्तरिय संमेलन अध्यक्षस्थानी वर्‍हाडी कथाकार सु.पुं अढाऊकर, तर प्रमुख अतिथी म्हणून म.रा साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य बारोमासकार डॉ.सदानंद देशमुख, स्वागताध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय.एम.देशमुख, सिने अभिनेता कुणाल मेश्राम, देवकाताई देशमुख, पुष्पराज गावंडे, प्रा.डॉ.संतोष हुशे, प्रा संजय पोहरे, डॉ.किरण वाघमारे,प्रा.दिपाली सोसे, डॉ. मनोहर घुगे, गजानन हरणे,मिलिंद इंगळे, डॉ.विनय दांदळे तसेच तरूणाई फाऊंडेशन संस्थेचे संदिप देशमुख आदीची उपस्थिती होती.  

    Post Views:  31


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख