अंकुर साहित्य संघाच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी राजाभाऊ देशमुख कार्याध्यक्ष पदी कृष्णराव घाडगे तर सचिवपदी धीरज चावरे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Sep 2022, 10:18 AM
   

महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या  अंकुर साहित्य संघाची वार्षिक सभा हिंमतराव शेकोकार पुण्यतिथी अंकुर  संघाचा वर्धापन दिन नुकताच कौलखेड अकोला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डाँ. प्रमोद काकडे तर प्रमुख अतिथी म्हणून अंकुर राजमाता शीलाताई राजपूत प्रा मधुकर वडोदे रेखाताई शेकोकार  तुळशीराम बोबडे  हे उपस्थित होते. 
या सभेमध्ये अंकुर साहित्य संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली  अकोला जिल्हाध्यक्ष पदी राजाभाऊ देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष पदी कृष्णराव घाडगे तर सचिवपदी धीरज चावरे यांची निवड केंद्रीय अध्यक्ष हिंमत ढाळे कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे सचिव सुरेश लांडे यांनी निवड पत्र देऊन केली कार्यकारिणी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत भोंडे आकाश डाहेलकर राजकुमार तडस सहसचिव गोपाल मापारी कोषाध्यक्ष संजय गावंडे जिल्हा संघटक सुनिल लव्हाळे सुमेध वानखडे देविदास चव्हाण अंबादास चांदूरकर मारोती नागोसे  महिला संघटक प्रतिभा शिरभाते गोदावरी कलोरे दिपाली माथने प्रमुख सल्लागार प्रा जनार्दन बांबटकर विष्णुपंत जोध डॉ. प्रकाश गवळी वसंत कासार कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब सोळंके गजानन काळे माधव गावंडे तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी संदीप देशमुख यांची  निवड करण्यात आली आहे. त्यांचे शैक्षणिक साहित्यिक सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमासाठी अंकुर साहित्य संघाचे बहुसंख्य सभासद उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख राजेश काटोले यांनी कळविले आहे.

    Post Views:  239


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व