जागतिक महिला दिन; महिलांसाठी मंगळवारी रोजगार मेळावा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Mar 2022, 11:39 AM
   

 अकोला : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. 8 मार्च रोजी नियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे करण्यात आले आहे या मेळाव्यात चार कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहेया मेळाव्याचा महिलांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

            रोजगार मेळाव्यात अकोला येथील श्रीसॉप्ट टॉयएमआयडीसीलेबन लाईफ साईन्स प्रा.लिएमआयडीसीऔरंगाबाद येथील धुत ट्रान्समिशन प्रा.लि. व भारतीय विमा निगम अकोला शाखा-1 या कंपनीमध्ये विविध 119 रिक्त पदांकरीता मुलाखती घेण्यात येणार आहेतइच्छुक महिलांनी  सहभागी होण्यासाठी https://akola.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करुन सहभाग नोंदवावातसेच अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्रअकोला किंवा दुरध्वनी क्रमांक 0724-2433849 येथे संपर्क साधावाअशी माहिती कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त  यांनी दिली आहे.

    Post Views:  333


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व