पुण्यातील विद्यापीठ हायस्कूलचा ९१.११ टक्के निकाल
पुणे--- महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचा दहावीचा निकाल ९१:११ टक्के लागला. विद्यालयात आर्या पाटील ( ८७.४०) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. प्रांजली येरापले ( ८७.००) व वैष्णव हीक्के ( ८७:००), आदित्य गावले (८६:००),समीक्षा शेट्टे ( ८६:००) यांनी अव्वल स्थान पटकाविले. मुख्याध्यापक विष्णू मोरे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे, मुख्याध्यापक विष्णू मोरे,पालक संघाचे उपाध्यक्ष भगीराम गोरखा, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 284