सुनंदा पाटोळे यांचा सेवापूर्ती समारंभ


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Aug 2023, 2:31 PM
   

जि.प.प्राथ.शाळा तिन्हेवाडी न.१ च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा पाटोळे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालय चांडोली पुणे-नाशिक हायवे येथे पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी  अरुणभाऊ थिगळे (तिन्हेवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच) सतीश राक्षे (खेड पंचायत समितीचे मा.उपसभापती) कैलासराव गायकवाड (मा. सरपंच वडगाव पाटोळे),रंगनाथ आरूडे,पांडुरंग आरूडे, नाना आरुडे,शिवाजी आरूडे,विकास आरुडे(अध्यक्ष शा.व्य. समिती),आरतीताई टेंभुरकर(उपाध्यक्षा शा.व्य.समिती)आदी मान्यवर उपस्थित होते.
          सुनंदा पाटोळे मॅडम या सत्काराला उत्तर देताना; आपल्या ३७वर्षांच्या सेवेचा जीवनपट उलगडताना म्हणाल्या उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी,घरट्याचे काय केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी! ...काही प्रसंगी त्या भावूक ही झाल्या.तुकईभांबुरवाडी केंद्राच्या शिक्षकांच्या वतीने उभयतांना संपूर्ण पोशाख व सुवर्ण मुद्रिका देऊन गौरविण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा .कल्पनाताई टाकळकर यांनी भूषविले. या कार्यक्रमास खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी शुभेच्छा दिल्या.
       कार्यक्रमाचे नियोजन  दत्तात्रय तिटकारे,बाळासाहेब बारवेकर,नारायण बनकर,अजय पाटील,हरीश हजारे, हनुमंत लोंढे,चंद्रकांत डफळ, लता तळपे,मनीषा कांबळे,पद्मा शिंदे,नंदा जंगले,संध्या तेंडोलकर, अनिता केदारी,शिल्पा कोरडे,हेमा घोलप,चंद्रकांत ढवळे,यांनी केले.रेखा लांडे व अलका डफळ यांनी मनोगते व्यक्त केली.सुंदर असे ईशस्तवन व स्वागतगीत तुकईभांबुरवाडी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
     प्रस्ताविक सुरेश आदक सूत्रसंचालन आत्माराम शिंदे यांनी केले तर आभार विजयकुमार शेटे यांनी मानले.कार्यक्रमाची इतर सर्व व्यवस्था केंद्रातील रोहिणी बनकर,सुजाता बोराडे, सुरेखा पालवे,विद्या भापकर,निलम आढारी, निलिमा गोपाळे,सुनंदा शेळके,सविता धाडगे यांनी पार पाडली.

    Post Views:  142


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख