न्यु तापडीया नगरात श्रीराम शोभायात्रा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-04-12
(अभिषेक राशलवार) अकोला : स्थानिक न्यु तापडीया नगरात शिवराज रामभक्त मंडळातर्फे श्री रामनवमीचा उत्सव, मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत दाखविण्यात आलेले श्रीराम व सितामाईचे नयनरम्य चित्रदृश्य चित्तवेधक ठरले. यावेळी नगरसेवक हरिशभाऊ काळे, संजय ठाकूर, दिपक वाघमारे, उमेश श्रीवास्तव, नरेश दक्षिणकर, रामभाऊ शेळके प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यु तापडीया नगरमध्ये घराघरांसमोर रांगोळ्या काढून महिलांनी या शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अंकुश भेलांडे, केतन मित्रा, गणेश मिश्रा, शुभम चोपडे, अभिषेक राशलवार, ऋषीकेश राऊत, मंगल इंगळे, ऋषीकेश पोकडे आदी युवकांचा उत्साहपूर्ण सहभाग होता.
Post Views: 321