जेष्ठ साहित्यिक डॉ.अशोक शिरसाट यांच्या साहित्यकृतींचे आळंदीत प्रकाशन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 Jan 2025, 8:29 AM
   

अकोला - अकोला येथील ज्येष्ठ साहित्त्यिक डॉ.अशोक सिरसाट यांच्या दोन साहित्त्यकृतीचे प्रकाशन  आळंदी येथे थाटात संपन्न झाले.महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन , मुक्ताईनगर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन, आळंदी ,पुणे येथे दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध निवेदक , मुलाखतकार, जेष्ठ साहित्यिक मा.सुधीरजी गाडगीळ साहेब (पुणे ) होते. तर या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा जेष्ठ कवयित्री  मा.सुमती पवार मॅडम  ( नाशिक ) होत्या. या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांतर्गत "डॉ. अशोक शिरसाट व्यक्ती आणि वाङ्ममय " ( आस्वादक समिक्षा )  तसेच "पाखरांच्या व्याकुळ हाका " हा बालकवितासंग्रह अशा दोन साहित्यकृतींचे प्रकाशन कार्यक्रमाचे उदघाटक मा.सुधीर गाडगीळ , संमेलनाध्यक्षा मा.सुमती पवार मॅडम, स्वागताध्यक्ष _ प्रा.डॉ. सुरेन्द्र हेरकळ तसेच उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवचरण उज्जैनकर, फाऊंडेशनचे राज्याध्यक्ष मा.डॉ. सुभाष बागल , राज्य सचिव मा.अॅड. सर्जेराव साळवे व आळंदी संस्थानचे विश्वस्त मा.अजित वडगांवकर, संयोजक _श्री प्रकाश काळे, कार्याध्यक्ष - मा.सुरेश वडगांवकर , निमंत्रक - रूपाली चिंचोलीकर , सहनिमंत्रक -डॉ. ज्ञानेश्वर पाटील , बालभारती , पुणे येथील सेवानिवृत्त विशेषाधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे ,म.रा. मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, विलास सिंदगीकर , प्रा.आयुतोष पाटील , प्रा. प्रकाश होळकर व फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या प्रसंगी भरगच्च तमाम महाराष्ट्रातील साहित्यिक मंडळी व साहित्यप्रेमी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनिल धनगर पुणे व योगिता पाखले पिंपरी चिंचवड यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. निशीकांत धुमाळ यांनी केले.

    Post Views:  140


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व