वैभव हराळ- जिल्हा प्रतिनिधी
श्रीगोंदा पोलीस स्टेशन पासून २०० मीटर अंतरावर जुगार, गुटखा दारू वेश्याव्यवसाय, मटका चालू असून पोलिस कागदपत्री कारवाई करीत आहेत. केली तरी १तासात पुन्हा धंदे चालू होतात.मटका घेणाऱ्यांवर कारवाया आणि मटका चालवणाऱ्या मालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. कारण ते राजकीय पुढारी यांचे कार्यकर्ते आहेत.हातभट्टी व जुगार वेश्याव्यवसाय चे पण तसेच आहे.
श्रीगोंदा तालुक्यात, मटका, हातभट्टी, दारू, जुगार , गुटखा ,वेश्याव्यवसाय, हॉटेल व ढाबे वर बिनधास्त , गांजा दारू, विक्री राजरोस होते. वाळू तस्करी, दूध भेसळ, असे प्रकार चालू आहेत. वरील सर्व प्रकार तालुक्यात सुरू असून बेलवंडी, व श्रीगोंदा पोलिस बघ्यांची भूमिका घेत आहेत . तसेच कोणी मागासवर्गीय पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तर तुमच्या विरोधात पण क्रॉस गुन्हा नोंद करण्यात येईल असे सांगितले जाते. त्यामुळे लोक गप्प बसत आहेत त्याचा फायदा गुन्हेगार घेत आहेत.
पोलिस निरीक्षक यांना जर ढाब्यावर किंवा हॉटेल वर दारू किंवा वेशाव्यवसाय चालू आहे असे सांगितले गेले तर ते दारूबंदीवाल्यांना सांगा अशी उत्तरे दिली जात आहे. इतर धंदे बाबत कारवाई चालू असल्याचे सांगण्यात येते.प्रत्यक्ष अशी कोठेही कारवाई दिसत नाही. उलट तक्रार करणाऱ्यांचे नंबर व नाव हॉटेल व ढाबेवाले, वाळू माफिया यांना दिले जातात.
श्रीगोंदा व बेलवंडी पोलिस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे कोणती कारवाई होत नाही. श्रीगोंदा एसटी स्टँड परिसर मध्ये तर राजरोस पणे धंदे जोमात सुरू झाले आहेत. पोलिसांचे स्थानिक गुन्हे पथकाने आदेश दिले तर कारवाई होते,नाही तर बघ्याची भूमिका घेत आहेत. आमदार विक्रम पाचपुते यांनी मध्ये आवाज उठवला. त्यानंतर बंद झाले होते. आता पुन्हा सुरू झाले आहेत याबाबत लवकरच सामाजिक कार्यकर्ते जनआंदोलन करणार आहेत.असे समजते. नवीन पोलिस अधीक्षक रुजू झाले आहेत.त्यांनी विशेष पथकाचा वापर केला आता ते गप्प असून लवकरच त्यांनी पुन्हा पथके तयार करून कारवाई करावी न केल्यास गृह मंत्री यांना याबाबत माहिती देण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक म्हणतात ढाब्यांवर मिळणारी दारू बंद करणे आमचे काम नाही. त्यामुळे उघडपणे दारू विक्री मटका हातभट्टी, जुगार वेश्याव्यवसाय सुरू झाला आहे .
Post Views: 235