महाशिवरात्रि निमित्ताने राजेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
28 Feb 2022, 8:14 PM
अकोला : महाशिवरात्रीच्या निमित्ताने राजराजेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीत सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले.
महाशिवरात्रि निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची होणारी मोठ्या प्रमाणात गर्दी बहून हा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. पोळा चौकाकडून बस स्टॅण्डकडे जाणाऱ्यांनी किल्ला चौक- हरिहरपेठ- वाशीम बायपास लक्झरी स्टॅण्ड- सरकारी बगीचा जिल्हा परिषद ते अशोक वाटीका ते बस स्टॅण्ड या मार्गाचा अवलंब करावा. याशिवाय डाबकी रोड ते बस स्टॅंडकडे येणाऱ्यांनी डाबकी चौकी ते श्रीवास्तव चौक, भिमनगर चौक-जूना दगडीपूल-रायली जीन कोतवाली चौक ते बस स्टॅण्ड या मार्गाने जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.
Post Views: 139