कविता स्वातंत्र्याच्या देगांव येथील फुले वाचनालयात काव्य मैफिल कार्यक्रम संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Aug 2024, 11:56 AM
   

देगांव  - स्थानिक अकोला जिल्हयातील देगांव येथील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर कविता स्वातंत्र्याच्या  काव्य मैफिलीचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट होते. प्रमुख उपस्थिती अॅड. मिलींद इंगळे तसेच माजी प्राचार्य प्रा. दिलीप इंगळे यांची लाभली. याप्रसंगी सुरुवातीला विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिव्य प्रतिमेचे पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यांत आले. दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यांत आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये बी.ए. भाग -३च्या मराठी पुस्तकांत अभ्यासक्रमांत देगांवचे जेष्ठ साहित्यिक कवि डॉ.अशोक शिरसाट यांची बाबा ही कविता सामाविष्ट झाल्याबद्दल त्यांचे अॅड. मिलींद इंगळे , माजी प्राचार्य प्रा.दिलीप इंगळे यांचे सह गावातील उपस्थित नागरिकांनी शाल-श्रीफळ, पुष्पहार घालून हार्दिक अभिनंदन केले. डॉ.शिरसाट यांच्या साहित्यिक क्षेत्रांतल्या उंच भरारीने देगांवचे नांव साहित्यिक विश्वात उज्वल केले. त्याबद्दल मान्यवरांनी व उपस्थितांनी शानदार सत्कार केला. त्यानंतर कविता स्वातंत्र्याच्या या काव्य मैफिलीने कार्यक्रमास आणखीच रंगत चढली. कवि- मोहन अवचार, कल्पना ताई तायडे, प्रदिप तायडे , आशाताई तायडे , क्षीरसागर अंभोरे आदिंनी आपापल्या रचना व कविता गावून सादर केल्या. सन्मानपत्रे व गुलाब पुष्प प्रदान करून कविंचे मनःपूर्वक स्वागत करण्यांत आले. या काव्य मैफिलीचे सुत्रसंचालन कल्पना ताई तायडे यांनी केले, तर राजु इंगळे यांनी सर्वांचे आभार मानले.

    Post Views:  193


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व