एल. आर. टी च्या एन. सी. सी. कॅडेटने मिळविले ०४ सिल्व्हर मेडल


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Jul 2023, 1:52 PM
   

नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अकोला अंतर्गत सी. ए. टी. सी. कॅम्प १०२ चे आयोजन करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये श्रीमती एल. आर. टि. कॉलेज, पी. डी. के. व्ही., शिवाजी कॉलेज, आर. एल. टी. कॉलेज, आर. डी. जी. कॉलेज व अकोल्यातील ०८ शाळेचे मिळून जवळपास ३८० एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. १० दिवस चाललेल्या या कॅम्प दरम्यान कॅडेटला नेतृत्व, एबट्रेकल, फायरिंग तसेच त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा व जबाबदाऱ्या कॅडेट्सला देण्यात आल्या. यामध्ये श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. च्या कॅडेटने कँपच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन उत्तम रित्या प्रदर्शन करून ०४ सिल्व्हर मेडल प्राप्त केले. यामध्ये कॅडेट धनश्री चव्हाण हिला ड्रॉईंग व क्विझ कॉम्पिटिशन मध्ये सिल्व्हर मेडल, कॅडेट मोनिका ददगाळ हिला डिबेट व ड्रॉईंग कॉम्पिटिशन मध्ये सिल्व्हर मेडल, कॅडेट कल्याणी आम्ले हिला डान्स व फ्लॅग एरिया मध्ये सिल्व्हर मेडल, कॅडेट त्रिशब कोकाटे याला डान्स व फ्लॅग एरिया मध्ये सिल्व्हर मेडल देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कॅडेटला कॅम्प कमांडर यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानीत केले गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. आर. डी. सिकची, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. जी. गोंडाणे, प्राध्यापक डॉ. एम. सी. डाबरे व एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सनी मिळविलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. एन. सी. सी. कॅडेट्सनी मिळवलेल्या यशाबद्दल  बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजित परांजपे, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव सी. ए. विक्रम गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

    Post Views:  122


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व