अकोला देशमुख समाजसेवा मंडळ,महिला मंडळ व जागृती मंडळाचे अमरावती येथे सत्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-01-31
अकोला-- सामाजिक संघटन आणि विधायक उपक्रमांसाठी एकत्रितपणे वधू वर परिचय व स्नेहमिलन मेळावे तथा सामाजिक मदतीच्या विविध उपक्रमातील सक्रियतेच्या वाटचालीबाबत डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख बहूद्देशिय समाजसेवी संस्थेच्या वतीने अकोल्यातील देशमुख समाजाच्या तिन मंडळांना उल्लेखनिय कार्याबद्दल अमरावतीच्या व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले.
स्व.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख बहूद्देशिय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनराव देशमुख, सचिव श्री अमोल देशमुख गावंडगावकर व पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ,देशमुख महिला मंडळ व देशमुख समाज जागृती मंडळाला उल्लेखनिय सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहण्यासाठी रितसर निमंत्रित केले होते.या आयोजित कार्यक्रमात देशमुख समाजाच्या या तिन्ही मंडळांचा तेथील व्यासपीठावर सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन वेगवेगळ्या पध्दतीने सत्कार करण्यात आले.
अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळाचा सत्कार अध्यक्ष श्री.संजय एम.देशमुख, निंबेकर,उपाध्यक्ष श्री.के.व्ही देशमुख,डोंगरगांवकर सचिव श्री.अश्विन देशमुख,व कोषाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख, नारखेडकर यांनी तर महिला मंडळाचा श्रीमती कविताताई ढोरे,सौ.कल्पनाताई देशमुख,सौ.लताताई देशमुख,सौ.शुभांगी देशमुख,सौ.संगीता देशमुख,सौ.विद्या देशमुख यांनी तर जागृती मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री संजय कृ. देशमुख,कंझारेकर,अश्विन देशमुख,राजाभाऊ देशमुख( रिधोरेकर),यशवंत देशमुख,अंकूश तवर,अनिल वानखडे,योगेश देशमुख,हरिष देशमुख,दत्ता देशमुख, यांनी व्यासपीठावर जाऊन हे सन्मान स्विकारले.



अमरावती येथे विविध ठीकाणच्या सन्माननिय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय वधू वर परिचय व स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागांतील समाजबांधव व उपवर वधू वरांची लक्षणिय उपस्थिती होती.मंडळाचे अध्यक्ष श्री नितीनराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली,सचिव सर्वश्री अमोल देशमुख,उपाध्यक्ष प्रा.दिपक देशमुख,श्रीकांत देशमुख,प्रविण देशमुख,पंकज देशमुख,कोषाध्यक्ष अनिकेत देशमुख आणि सर्व पदाधिकारी, सहकारी व महिला मंडळाच्या विशेष सहकार्याने हा समारंभ भव्य प्रमाणात यशस्वी झाला.याप्रसंगी अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ,देशमुख महिला मंडळ व देशमुख समाज जागृती मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 395