अ‍ॅड. सदावर्तेंना पुन्हा पोलिस कोठडी न्यायालयाचा निर्णय


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 Apr 2022, 8:16 PM
   

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणार्‍या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलिस कोठडी द्या, अशी मागणी पोलिसांनी केली होती. 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी रविवारी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आले असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आले होते याची माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहेत.
एसटी कर्मचार्‍यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले होते. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाजाजवळ जाऊन घोषणाबाजी सुरू केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचे समोर आले. आंदोलक एसटी कर्मचार्‍यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे. 
सदावर्तेंनी जमवले 1.80 कोटी रुपये
मुंबई : आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचार्‍यांकडून वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी 1.80 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. पाच महिन्यांपासून एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांकडून कोर्टात केस लढणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रत्येक कर्मचार्‍याकडून 530 रुपये प्रमाणे एकूण 1.80 कोटी रुपये गोळा केले.

    Post Views:  241


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व