बोईसरमधे मुद्रांक विक्री घोटाळा उघड...
संतोष घरत- जिल्हा प्रतिनिधी
बोईसर | दुय्यम निबंधक पालघर २ या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या त्रिवेदी कंपाऊंड बोईसर येथील परवाना क्रमांक - 1209010 किशोर अनंत वडे या मुद्रांक विक्रेताकडून चढ्या भावाने मुद्रांक विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून मुद्रांक जिल्हाधिकारी यांना वारंवार आदेशीत केल्यानंतर देखील असे प्रकार घडत असल्यामुळे सर्वत्र आच्छर्य व्यक्त केला जात आहे.
दुय्यम निबंधक पालघर २ यांच्या अधिपत्याखाली असलेल्या त्रिवेदी कंपाऊंड येथील किशोर अनंत वडे या मुद्रांक विक्रेताकडून १०० रूपयांचा मुद्रांक ११० रूपये, प्रत्येक मुद्रंकावर १० रुपये,तर १० रुपयांचा कोर्ट फि स्टॅम्प ११ रुपयात विक्री केला जात आहे. मुद्रांक विक्रेता परवाना मिळाल्यापासून आतापर्यंत कितीचा भ्रष्टाचार झाला असेल ह्याचा अधिकाऱ्यांनी शोध घेऊन बोध घेणे गरजेचे आहे.
मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत विक्री करावयाचे असून त्या बदल्यात शासन त्यांना ठराविक परतावा देत असतो परंतु बोईसर परिसरात अनेक जमिनीचे व्यवहार हे नोटरी पद्धतीने केले जात असून आदिवासींच्या जमिनी या परप्रांतीयांचा घशात बेकायदेशीर जात असताना मुद्रांक विक्रेता देखील हे मुद्रांक चढ्या भावाने विक्री करून आपली पोळी भाजून घेत असल्याचे बोललं जात आहे.
मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्रांक शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने विकल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- श्रीकांत कांबळे - दुय्यम निबंधक, पालघर-२
Post Views: 148