एल.आर.टी.च्या एन.सी.सी. युनिट तर्फे वीर जवानांना अभिवादन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
26 Jul 2025, 5:15 PM
अकोला - स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्स यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त स्थानिक नेहरू पार्क स्थित हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभियान राबवून वीर जवानांना अभिवादन केले. एल.आर.टी. महाविद्यालयाचे एन.सी.सी.ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॅप्टन डॉ. अनिल तिरकर हे कॅडेट्सला मार्गदर्शन करताना म्हणाले कारगिल युद्धात पराक्रमाने लढलेल्या भारतीय लष्कराच्या सर्व शहीद जवानांनी कारगिलची शिखरे पाकिस्तानी घुसखोरांपासून परत या दिवशी मिळवून दिला. कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस इतिहासाच्या पानांवर अभिमानाचा दिवस आहे. भारतीय लष्करासाठी हा सन्मानाचा दिवस आहे. यावेळी सर्व एन.सी.सी. कॅसेट्सनी हुतात्मा स्मारक येथील शहीद वीर जवानांना पुष्पार्पण करीत श्रद्धांजली वाहिली. यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉर्पोरल अविनाश वाकोडे, कॅडेट ओम भारती, कॅडेट हर्ष देवगिरीकर, कॅडेट आदित्य टाले, कॅडेट निखिल मोरया, कॅडेट वैभव काळपांडे, कॅडेट वेदांत वैराळे, कॅडेट सुरज ठोसर, कॅडेट पियुष धांडे,
कॅडेट आयुष कुलकर्णी, एलसीपीएल कोमल मेश्राम, कॅडेट श्रद्धा पांडे, कॅडेट पल्लवी शिरसाट, कॅडेट अनुश्री दाणे यांनी मेहनत घेतली.
Post Views: 32