Akola : चिंचोली गणू येथील राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ इंगळे यांचा आंरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल वाडेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री सुभाष इंगळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजीव गांधी विद्यालयाचे राजाभाऊ इंगळे यांना
आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ विमल शिवचरण डोंगरे व सर्व शिक्षक वृंद यांनी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष,शाळा समिती श्री ज्ञानदेव अंभोरे तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री सुभाष इंगळे केंद्र प्रमुख होते सत्कार समारंभामध्ये शाळेच्या सौ विमल डोंगरे, मुरलीधर रेवासकर सह विकास वाडकर सह सौ संगीता भटकर विषय शिक्षक तसेच शापूआ कर्मचारी सौ तुळसाबाई सरदार, विलास सरदार, अन्नपूर्णाबाई गोतमारे यांनी सत्कारमूर्ती सेवा बदल मनोगत व्यक्त केले नंतर सत्कारमूर्ती श्री राजाभाऊ इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आज आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ह्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे व सर्व शिक्षक वृंद यांनी तसेच केंद्रप्रमुख श्री सुभाष इंगळे सर यांनी द सत्कार केला त्याबद्दल मी खूप आनंदित होऊन सर्वांचे आभार व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील बाहे यांनी, तर आभार प्रदर्शन श्री मुरलीधर रेवासकर यांनी केले याप्रसंगी गावातील बहुसंख्य लोक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, राजीव गांधी विद्यालयाचे शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 171