उरळ पोलिसांकडून अवैध देशी- विदेशी दारूसह १ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2025-07-25
   

अकोला - जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटनाच्या जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चितजी चांडक यांच्या निर्देशानुसार उरळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जुना अंदुरा येथे देशी विदेशी दारूच्या साठ्यासह रू.१ लाख ९५ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये विविध ब्रॅन्डच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या,मोबाईल आणि मोटरसायकल अशा साहित्याचा समावेश आहे.
    याप्रकरणी गणेश सुभाष कड (२३) व उमेश विष्णू भालेराव (३५) या दोघांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चितजी चांडक,अप्पर पोलिस अधिक्षक रेड्डी जी, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन यांचे मार्गदर्शनखाली एपीआय पंकज कांबळे व सहकाऱ्यांनी केली.यामध्ये पोलिस हवालदार महेमूद खान, अमरदिप गुरू,शिपाई शुभम् बोडखे,महिला शिपाई रूक्मीणी घोडके यांचा समावेश होता.

    Post Views:  51


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व