औरंगाबादः शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला असताना शिंदे गटाच्या मंत्र्याचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. औरंगाबादचे आमदार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचं हे वक्तव्य आहे. औरंगाबादेत आज हिंदु गर्व गर्जना यात्रेदरम्यान मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्तार म्हणाले, मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. हा कमजोर कमकुवत माणसाला सपोर्ट लागतो. आपण कार्यकर्ता आहोत. कार्यकर्ता माणसाला कधीही भीती वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. आमदारकी, मंत्रिपद जातं. पण कार्यकर्ता पद जात नाही. काम केलं तशी शक्ती मिळते. मग कितीही गतिरोधकं आले तर सरळ गाड्या मुंबईपर्यंत जातात. आणि एकदा जनतेनं स्वीकारलं नाही तर वखरावरही कुणी ठेवत नाही, असं वक्तव्य सत्तारांनी केलंय.
Post Views: 137
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay