अकोला : स्थानिक रणपिसे नगर, टाले अपार्टमेंट, प्लॉट नंबर 4 अकोला येथील विधवा महिला श्रीमती मंगला मुरलीधर सावके यांचे हिरंगी गावातील तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथील शेत सर्वे नंबर 85 एकूण क्षेत्र ३.५ एकर मध्ये उसाची लागवड केली होती. परंतु विद्युत वितरण कंपनीच्या हाय टेन्शन लाईनच्या शॉर्टसर्किटमुळे या विधवा महिलेच्या शेतातील संपूर्ण उसाची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे या विधवा महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे झालेले आहे. या संबंधीची तक्रार या महिलेने जिल्हाधिकारी वाशिम ,पोलीस अधीक्षक वाशिम, तहसीलदार, मंगरूळपीर, विद्युत वितरण कंपनी शेलुबाजार मंगरूळपीर तलाठी, पोलीस स्टेशन शेलुबाजार आदी विविध ठिकाणी आपल्याला न्याय मिळावा म्हणून निवेदने सादर केलेली आहे. परंतु निवेदन देऊन पुष्कळ दिवस झाले. तरीही या महिलेला अजूनही न्याय मिळालेला नाही. आधीच पती वारलेला असताना गरीब परिस्थितीत जीवन जगत असलेले या महिलेची आर्थिक कुचंबणा होत आहे. आपल्याला उसाचे येणारे उत्पादन डुबललेच आहे. परंतु पुन्हा त्या शेतामध्ये पेरणी कसी करावी हा प्रश्न आ वासून या महिले समोर उभा आहे. तरी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी ,प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्याने दखल घेऊन त्वरित न्याय देण्याची मागणी विधवा शेतकरी महिला श्रीमती मंगला मुरलीधर सावके यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Post Views: 238
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay