पंतप्रधान आवास योजनेतून गरीबांना डावलून बोगस लाभार्थींना घरे..!
भ्रष्टाचार न थांबविल्यास मनसे कडून आंदोलनाचा इशारा..!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2024, 6:31 PM
भिमराव येरणवाड- तालूका प्रतिनिधी
देगलूर - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरीबांना पक्की घरे देण्याचं काम मोदिजी करतं असताना , देगलूर तालूक्यातील काही कर्मचारी व अनेक सरपंच या योजनेवर नागोबा होऊन बसलेले आहेत, शझोपडीत राहणारा मजुर, भुमीहीन, रात्रीचा दिवस करून कष्ट करणारा गरीब हे खरे लाभार्थी असून ते मात्र पत्र्याच्या शेडमधे राहतात. अशा लोकांना पक्की घरं देण्याचं सोडून श्रीमंत लोकांनाच या घरांचा लाभ मिळत आहे, यात गरीब बाजुलाच सारला जात आहे. प्रत्येक घरासाठी ३ ते ५ हजार घेतली जात असून ग्रामसेवकांकडून ,गरीबांची यादीत नांवं येऊन सुद्धा, त्यांना घरं दिलं जातं नाहीत ही दुर्दैवी बाब आहे .दुसरीकडे एक माणूस मात्र पाच वर्षांत तिनदा लाभ ऊचलतो . त्याचं घर व दहा एकर शेतजमीन असून सुध्दा त्याने ३ वेळा घराच्या योजनेतून लाभ घेतलेला आहे. त्यासाठी बिलांची बोगस रक्कम ऊचलली गेलेली आहे. पण झोपडीतल्या गरीबाला एकदा सुध्दा लाभ मिळत नाही.घर वाटपाच्या योजनेत देगलूर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक लाखोंनी पैसे जमा करत आहेत . वरीष्ठ अधिकारी व प्रशासन डोळे मिटून शांत झोप काढत आहे .खरे लाभार्थी मात्र वंचित आहेत. या सर्व अनागोंदी मुळे देगलुर तालूक्यातील वाडी वस्तीतील गरीब लोक ऊदासीनतेत आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत गरीबाला घर मिळत नाही ही लोकशाहीची शोकांतिका आहे.तरी गटविकास अधिकाऱ्यांनी या योजनेवर लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे .हा भ्रष्टाचार लवकर थांबवावा आणि गरीबांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
गरीबांजवळ पोटाची खळगी भरण्यासाठी पैसाच नाही मग अधिका-यांना कुठून देणार ? खऱ्या गरजु लोकांना या योजनेचा लाभ मिळावा ,अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देगलुर येथे गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देगलुर मनसेचे तालूका सचिव भिमराव येरनवाड यांनी दिला आहे.
Post Views: 505