महाराष्ट्रामधील हिंदूमध्ये गणती केल्या जाणार्या जाती, भटक्या जाती, ईतर मागासवर्गीय १८ पगड जातींची खर्या अर्थाने संविधानात बहूजन नोंद केली असली तरी, काही हिंदू म्हणविणारे स्वतःला अजूनही उच्चवर्णीय समजत असतात. खर्या अर्थाने त्यांनी इ.सन मागील १६०० ते १७ व्या शतकामधील इतिहासाचे वाचन केले नसावे. मित्रांनो ! त्या काळी मुस्लीम सत्ता हुकूमत आपल्या देशावर ८०० वर्षे होती. ज्यावेळी राजे शिवाजी महाराज जन्माला आले त्यांनी हिंदू धर्मिय सर्व जाती पातीला एकत्र संघटीत करुन मजबूत लढावू बनविले. आपल्या सैन्यात समाविष्ट करून सर्वांना मावळे, मर्द मराठे, म्हणून युद्धामध्ये मुस्लीम राज्य जिंकून आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टांनी किल्ले बांधून ठेवले. ते हिंदू सैनिकाद्वारे ताब्यात घेतले होते. म्हणून आजच्या नौजवानांनी हा मागील इतिहास वाचणे व समजून घेणे अती गरजेचे आहे. कारण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशामधील ब्राह्मण, पेशवाई यांची सत्ता असतांना स्वतःच्या विद्वतेच्या जोरावर मनुस्मृती ग्रंथाची होळी केली. कारण मनुस्मृतीने भारतातील महिलांची व येथील मागासवर्गीयांची गत कुत्र्या-मांजरापेक्षाही खराब करुन ठेवली होती. येथे कुत्र्या मांजरांना देव बनविले होते. माणसांचा त्यांना विटाळ होत होता. तसे मनुस्मृतीमध्ये नमूद असल्याने पुस्तकांवर प्रेम करणार्या महामानवांनी या ग्रंथाची होळी केली. देशातील ब्राह्मणांनी शिक्षणाचे सर्व अधिकार त्यांचेकडे ठेवले होते, व इतरांना शिक्षणाची दारे बंद केली होती, परंतु बाबासाहेबांनी सर्व बहुजनांना शिक्षणाची दारे खुले करून दिली. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, पर्यंतचा इतिहास ज्यांनी वाचला असेल, त्यांना खरी माहिती मिळू शकते. म्हणून आजच्या नवपिढीतील व नवजवानांनी बहुजनांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपले जातीय धर्म वेगळे ठेवून प्रथम सर्व अठरा पगड जातींनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
मित्रांनो, सुशिक्षीत झालो परंतू अंधश्रद्धेने सारा हिंदू म्हणविणारा समाज त्या दगडांच्या मूर्तिपूढे डोके ठेवून आशिर्वाद मागतो, सुखी जीवन असावे अशा आणाभाका घालतो. त्याच देवा धर्माच्या नावाने मंदिरे बांधण्यासाठी लाखो, करोडोचे पैसे दान देतो आहोत आणि त्यापासून कुणाचे काय भले होणार आहे.? त्या बाबत कुणीही कधीच विचार केला नाही. महापुरुष विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहितांना विचार केला म्हणूनच बहुजनांना आरक्षण, नोकर्यांमध्ये सवलती, त्याच प्रमाणे बहुजन मराठा मागासवर्गीयांचे देशावर सरकार यावे. त्यांनी भिक मागू नये सत्ता हाती घ्यावी. कारण ८५ टक्के समाज हा बहुजन आहे. आणि फक्त १५ टक्के चार्तुवर्णीय लोक देशावर राज्य करीत आहेत. म्हणून आमच्या बहुजनांनी शिक्षण घेवून त्यांनी आपले अधिकार स्वतःच्या समाजाप्रती मिळवावे व महापुरुषांचे स्वप्न पुर्णत्वास ण्यावे.
ए.जी.घुगे
कवि/गायक/लेखक
अशोक नगर, रामदासपेठ, अकोला.
मो. ९८८१६५८८१९
Post Views: 35