अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व आगामी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सीबीएसई आंतर शालेय बँड स्पर्धेचे आयोजन प्रभात किड्स स्कूल येथे दि. १४ डिसेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत अकोल्यातील तीन सीबीएसई शाळांनी सहभाग घेतला.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत केंद्रिय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सी.बी.एस.ई द्वारे या स्पर्धेचे आयोजन प्रभात किड्स स्कूल येथे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, यादृष्टिने आयोजित या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि प्रभात किड्स स्कूलच्या बँड पथकांनी उत्स्फूर्त भाग घेतला आणि शिस्तबद्ध बँड कवायतीचे सादरीकरण केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या संयोजनात क्रीडा विभागाचे गजानन चव्हाण, गोविंदा जाधव, संजीवनी अठराळे, सीमा इंगळे, विजय वाहोकार यांच्यासह प्रभातच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे सचिव निरज आवंडेकर प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे यांनी भूषविले. या स्पर्धेला परिक्षक म्हणून राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे बँड कंमाडर सुनिल कुर्हेकर, राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे शरद चांदूरकर आणि संगीत शिक्षक मंगेश राऊत म्हणून लाभले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन स्पर्धेची रितसर सुरवात करण्यात आली. तत्पूर्वी अतिथींचा हृद्य सत्कार करण्यात आला. प्राचार्य तथा सीबीएसई समन्वयक वृषाली वाघमारे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेवर प्रकाश टाकला. सोनिया शर्मा यांनी कार्यक्रमाचे सुंदर संचालन केले तर शाळा व्यवस्थापक अभिजीत जोशी यांनी आभार मानले.
बँड संचलनाने दिली प्रजासत्ताक दिनाची अनुभूती
अत्यंत शिस्तबद्ध आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत बँडपथक स्पर्धेत सहभागी तीनही सी.बी.एस.ई शाळांनी उत्कृष्ट बँड पथक संचलन सादर केले आणि प्रजासत्ताक दिनाची अनुभूती दिली. अत्यंत लक्षवेधी बँड गणवेशामध्ये आलेल्या स्पर्धकांनी बँड, ब्रास ड्रम, बासरी, ट्रँगल, ट्रम्पेट, झायलोकेन, साईट्रम, बिगुल इत्यादी वाद्यांच्या नादाने संपूर्ण परिसर निनादून गेला होता.
बँड पथकातून शिस्त, स्वयंशासनाचा विकास - सुनिल कुर्हेकर
बँडपथकातील वाद्य वाजवणे केवळ कलासादरीकरण नसुन ते जिद्दीच, जिकरीचे काम आहे. त्यासाठी कठोर परिश्रम आणि सराव गरजेचा असतो. अत्यंत प्राचीन काळापासून बँडपथकाचा वापर होत आला असून या माध्यमातून शिस्त आणि स्वयंशासनाचे कौशल्य विकसिकत होत असल्याचे स्पर्धेचे ज्येष्ठ परिक्षक सुनिल कुर्हेकर म्हणाले. स्पर्धेनंतर स्पर्धकांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक ढेरे यांनी सहभागी संघांचे कौतुक केले आणि या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन विकास होत असल्याचे ते म्हणाले.
Post Views: 202
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay