प्राध्यापक निलेश जळमकर यांची चित्रपट महामंडळाच्या शासकीय सदस्यपदी निवड


 विश्वप्रभात  2025-07-10
   

अकोला : स्थानिक जवाहर नगर येथील जळमघर कोचिंग क्लासेसचे संचालक तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक लेखक चित्रपट निर्माता प्राध्यापक निलेश रावसाहेब जळमकर यांची नुकतीच शासनाच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ कोल्हापूर या समितीच्या अशासकीय  सदस्यपदी निवड झाली आहे. निवड झाली असल्याचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. अकोल्याच्या विविध स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे. आसूड नागपूर अधिवेशन महानायक वसंत तू आदी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे निलेश जळमकर हे अकोल्यातील नव्हे, तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा दिग्दर्शक कलावंत लेखक साहित्यिक म्हणून सर्व दूर परिचित आहेत  . हे विशेष. अकोल्याच्या नव्हे तर विदर्भाच्या सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे जळमकर या अगोदरही विविध समित्यावर कार्यरत होते.

    Post Views:  44


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व