अकोला : छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शंकरराव वाकोडे यांचे वडील भीमराव उकर्डाजी वाकोडे यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 97 वर्षाचे होते. त्यांचे मागे 2 मुले, 4 मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे राहते गाव गोरेगाव येथून निघेल. शिक्षकी पेशात 39 वर्षे काम करणारे भीमराव वाकोडे एक आदर्श शिक्षक व सामाजिक उपक्रम राबविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत प्रख्यात होते. सहाय्यक अध्यापक म्हणून त्यांनी अकोला व बार्शीटाकळी पंचायत समितीत कार्य केले होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे.
Post Views: 7