यानिमित्त बुधवार दिनांक ८ ते १० डिसेंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. बुधवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी हनुमान मंदिर येथून पालखी व कळस गाव प्रदक्षिण, सायंकाळी पाच वाजता हॉकी मैदानावरील खेळण्याचे उद्घाटन, गुरुवारी दिनांक ९ डिसेंबर रोजी सुवासिनीमार्फत मार्फत कलशातून आणलेल्या पंचगंगा पाण्याने मिरवणुकीत जलपूजन व अभिषेक. त्यानंतर वास्तुशांती व होमहवन, सकाळी ९.४५ वाजता कलशारोहन होणार आहे. शुक्रवारी १०डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंदिर आवारात महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती हनुमान मंदिर जिर्णोध्दार कमेटीचे अध्यक्ष व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय स्तरावरील समाजाभिमुख पत्रकार संघटनेचे केन्द्रीय मार्गदर्शक तथा सल्लागार सदस्य श्री सुर्यकांतजी तोडकर यांनी दिली आहे.Post Views: 307
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay