मोबाईल दुकानात चोरी, 3.50 लाखाचा मुद्देमाल लंपास
अकोला: महानगरपालिकेचा समोर असलेल्या मनपा कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 9 मोबाईल सह 3 लाख 50 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.
महानगरपालिकेचे समोर असलेल्या मनपा कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात चोरट्यांनी बालाजी मोबाईलमध्ये चोरी केली. त्यावेळी चोरट्यांनी 9 मोबाईलसह अंदाजे तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठसे तज्ञास प्रचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Post Views: 422