प्रा. मोहन ज्ञा.काळे हे दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक म्हणून निमंत्रित!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Feb 2025, 8:55 AM
   

खामगाव : खामगाव येथील व सद्या अकोला येथे राहत असलेले सुप्रसिद्ध कवी, कथाकार, गझलकार, लेखक प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांची दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कविकट्ट्यामध्ये कविता सादरीकरणासाठी निमंत्रित साहित्यिक म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे विविध साहित्यिक संघांकडून व साहित्यिक मित्रांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांच्या कथा, कविता, गझल, समीक्षण, लेख सातत्याने वर्तमानपत्रे, नियतकालिके, प्रातिनिधिक संग्रह व दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित होत असते. त्यांना पळस फुलला हा कथासंग्रह प्रकाशित झालेला असून त्या कथासंग्रहासाठी त्यांना अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात साहित्य सन्मान पुरस्कार, वऱ्हाड विकास बहुउद्देशीय संस्था अकोला यांचे तर्फे राज्यस्तरीय मां जिजाऊ वाड्मय पुरस्कार, प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र यांच्यातर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना याआधीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये कविता सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. विविध साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अखिल भारतीय अंकुर साहित्य संघाचे ते केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असून विदर्भ साहित्य संघ, सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, अखिल भारतीय वऱ्हाडी मंच, काव्यप्रेमी शिक्षक मंच, युगंधरा साहित्य संच, अक्षरक्रांती साहित्य संघ, साहित्य,कला व व्यक्तिमत्व विकास संघ सॄजन साहित्य संघ इत्यादी अनेक साहित्य संघांशी तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेशी ते जुळलेले जुळलेले असून विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर कुटुंबीय, मित्रपरिवार, कुणबी समाज कर्मचारी सेवा संघ व राष्ट्रीय पत्रकार महासंघ परिवारातर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

    Post Views:  135


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व