श्रीमती ल.रा. तो. वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा टेबल टेनिस संघ राज्यस्तरावर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Oct 2025, 10:33 AM
अकोला : नुकत्याच पुसद येथे पार पडलेल्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या टेबल टेनिस संघाने अमरावती येथील कनिष्ठ महाविद्यालयाला अंतिम फेरीत पराभूत करून विजेते पद प्राप्त केले व राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयाचा संघ पात्र ठरला आहे. कु. रिया कोठारी, गरिमा जालान, सारा जोशी, अनुष्का सोळंकी या खेळाडूंनी स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले. खेळाडूंच्या या यशाबद्दल दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड.मोतीसिंग जी मोहता, मानद सचिव डॉ पवन जी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इं. अभिजीत परांजपे यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणीने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे सर, क्रीडा शिक्षक प्रा.अजय पालडीवाल तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
Post Views: 70