खामगाव प्रेस क्लब द्वारे आयोजित आरोग्य शिबिरामध्ये 200 गरजू नागरिकांनी केली विविध आरोग्य तपासणी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 May 2025, 9:00 AM
खामगाव - खामगाव प्रेस क्लबचे सदस्य ज्येष्ठ संपादक समाजसेवक जगदीशजी अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त 2 मे शुक्रवार रोजी अग्रवाल हॉस्पिटल, गोकुळ नगर येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन खामगाव प्रेस क्लब आणि सर्व पत्रकार बांधव यांच्याद्वारे करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, उद्घाटक म्हणून खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्णजी पवार साहेब, आणि प्रमुख उपस्थिती मध्ये सुप्रसिद्ध उद्योजक व तालुका संघचालक संतोषरावजी देशमुख, ज्येष्ठ पत्रकार पंजाबरावजी देशमुख, योगेशजी हजारे, फारुख भाई आणि सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल यांनी 200 पेक्षा जास्त गरजू नागरिकांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये हाडांची ठिसूळता मशीन द्वारे तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात आली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन संभाजीराव टाले यांनी केले.
खामगाव प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव यांनी या शिबिराच्या यशस्वीते करिता अथक परिश्रम घेतले आणि गरजू लोकांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचवली. खामगाव शहरातील अनेक गणमान्य व्यक्तींनी आणि मित्र परिवाराने शिबिरास भेट देऊन जगदीशजी अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Post Views: 52