कार्यकर्त्यांनी संघटनेच्या कामासोबतच आर्थिक क्षमता ही बळकट करावी -डॉ. दीपक मोरे


छावा संघटनेचा दीपावली स्नेह मिलन मेळावा संपन्न
 विश्व प्रभात  03 Nov 2025, 11:10 AM
   

अकोला-कार्यकर्त्यांच्या परिश्रमाशिवाय कोणतीच संघटना अथवा पक्ष मोठा होऊ शकत नाही. परंतु हे कार्य करीत असताना कार्यकर्त्यांनी आपली आर्थिक क्षमता बळकट करण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या घर संसाराचा गाडा व्यवस्थित चालला तरच ते अधिक चांगल्या प्रकारे पक्ष किंवा संघटना मजबूत करण्यासाठी चांगला हातभार लावू शकतील. असे प्रतिपादन छावा संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक डॉ. दीपक मोरे यांनी केले. आज हॉटेल सूर्यवंशम येथे संपन्न झालेल्या छावा संघटनेच्या दीपावली स्नेह मिलन  मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख  अतिथी म्हणून छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, नेत्रतज्ञ  डॉ. श्रीराम लाहोळे, बालरोगतज्ञ  डॉ. निलेश दायमा, डॉ. संजय सरोदे, उद्योजक रितेश मिर्झापुरे, मनीराम टाले, छावाचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोतमारे, माजी नगरसेवक गिरीश गोखले, प्रशांत अवचार, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे, प्रमोद पाटील उपस्थित होते.
                 प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांनी प्रास्ताविक करून भविष्यात संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रदीप खाडे व निवृत्ती वानखडे यांनी  ही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
             याप्रसंगी छावा संघटनेच्या उत्कृष्ट प्रसिद्धी बद्दल प्रदीप खाडे यांचा, मोबाईल संच विक्रीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल दास मोबाईलचे रितेश मिर्झापुरे यांचा व समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल निवृत्ती वानखडे यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
              कार्यक्रमास  डॉ. संतोष भिसे, रजनीश ठाकरे, प्रकाश गवळी, वसंतराव पोहरे, अनिरुद्ध भाजीपाले, पंकज कौलखेडे, अमोल हिंगणे, बबलू मांगटे, बाळासाहेब लाहोळे, प्रवीण बाणेरकर, परीक्षित  बोचे, ऍड. सुशील खवले, श्याम कोल्हे, अरविंद बाणेरकर, बाळासाहेब रंधे, बबलू वसु, विवेक इंगळे, सचिन लोखंडे, संदीप कुलट, गोपाल पाटकर, देवेंद्र मोहोकार, सोनू गिरी, माधव म्हैसणे, मंगेश साबळे, नागेश कराळे, शिवा भगत, दीपक लोखंडे, सचिन माकोडे, मनीष लोखंडे, सचिन चांभारे, निखिल श्रीनगर, नितीन चव्हाण, जगदीश खडसे, प्रथमेश, गजानन लाहुडकर, निलेश इंगळे व इतरही सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शाम कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल हिंगणे यांनी केले.

    Post Views:  49


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व