महाविकास आघाडीचे उमेदवारास शेतकरी बचाओ आंदोलनाचा जाहिर पाठींबा
अकोला - शेतकरी बचावो आंदोलनाच्या अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक 14 रोजी श्री. प्रमोद पागृत यांचे अध्यक्षतेखाली व आंदोलनाचे प्रमुख संयोजक, भाई रजनीकांत यांच्या उपस्थितीमध्ये अकोला येथे संपन्न झाली व त्यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरदृष्टी प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये सहभाग घेतला व काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शेतमालास आधारभूत किमतीवर भाव देण्याचे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, जीएसटी मुक्त शेती व शेतकरी प्रधान निर्यात- आयात धोरण,त्याचप्रमाणे ३० लाख तरुणांना नोकरी व प्रत्येक तरुणाला प्रशिक्षणा दरम्यान ८५०० रुपये महिना वर्षभर देण्याचे अभिवचन दिले. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतमाला उत्पादन खर्चावर भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या होत आहेत तसेच बेरोजगारीमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वैफल्यग्रस्त झालेला आहे त्यालाही न्याय देण्याचे काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीर करण्यात मान्य केले त्याकरता आजच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला व अकोला लोकसभा मतदारसंघातील ७ ही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सहभागी होतील. भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये शेतमालाचे भाव दाम दुप्पट करू असे नरेंद्र मोदीने आश्वासन दिले. परंतु ते पूर्ण केले नाही एवढेच नव्हे तर दिल्लीला शेतकऱ्यांनी एक वर्ष केलेल्या आंदोलनामध्ये 700 शेतकरी ठार मारलेत. गेल्या चार महिन्यापूर्वी पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी एम. एस. पी. आधारभूत किमती प्रमाणे भाव मिळावेत, याकरता आंदोलन केले असता, रस्त्यामध्ये लोखंडी खिळे टोचलेत, एवढेच नव्हे तर सिमेंट काँक्रीटचे रस्त्यात अडथळे उभे केलेत.ही शेतकरीद्रोही भूमिका भाजपने घेतली. अकोल्याच्या खासदाराने यासंदर्भात शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही व नरेंद्र मोदी ला याबद्दल जाब विचारला नाही. या शेतकरी विरोधी भूमिकेबद्दल श्री. संजय भाऊ धोत्रे,खासदार यांचा निषेध करण्यात आला. अकोल्याचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दारूचा कारखाना आहे, मुलगा डॉक्टर सुजय विखे,भाजप खासदार यांची दारू कंपनी आहे,ती राज्यात व अकोला जिल्ह्यात दारू विक्री करून तरुणांना व्यसनी बनवून,मारण्याचे व महिलांना विधवा करण्याचे कार्य करीत आहे. अकोला जिल्ह्यात युवकांचे हाताला रोजगार देण्याकरीता शेतीमालावर प्रक्रिया उद्योग काढण्याऐवजी गेल्या ५ महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यभरात नवीन १८००० दारूची दुकाने काढलीत व बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याऐवजी दारू प्या व खुशाल मरा,व महिलांना विधवा करण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारचे आहे. अशा या शेतकरी विरोधी व दारुड्या सरकारला व त्यांचे उमेदवारास पराभूत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीमध्ये शेतकरी नेते मनोज तायडे, मुरलीधर सिरस्कार,शैलेश विनायकराव गावंडे, भांबेरीचे भाऊ भोजने, विनोद गावंडे टिटवा, डॉ. शंकरराव सांगळे, विठ्ठलराव गुजरकर, विनायक मोहोकार,शेतकरी नेते,अकोट ईत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग होता.
Post Views: 199