विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Jun 2024, 8:53 PM
   

Akola : चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत ३६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी आज ११ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, पीडिता सासरी नांदत असताना पती नामदेव जगदेव वाकोडे, जगदेव सुखदेव वाकोडे, कुसुम जगदेव वाकोडे, प्रकाश जगदेव वाकोडे, प्रतिभा प्रकाश वाकोडे (सर्व रा. खरबडी) व मंगला कचरू दाभाडे, अजय कचरू दाभाडे (दोघे रा उन्नां ता. खामगाव) यांनी संगनमत करून चारचाकी कार घेण्यासाठी पीडितेला माहेरवरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच तिच्या पतीला इतर आरोपींनी चिथावणी दिली की, पीडितेला वागवू नको. तू दुसरे लग्न कर, असे सांगितले. सोबतच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ या कालावधीत खरबडी येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त सात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमोल खराडे, प्रमोद साळोक करीत आहेत.

    Post Views:  43


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व