तेलंगणातील मुख्यमंत्री के.सी.आर. प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी द्या!


भारत राष्ट्र समितीची मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Aug 2023, 11:14 AM
   

अकोला : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना हजार करोड रुपयांच कर्ज माफीची घोषणा तेलंगणाचे लोकप्रीय मुख्यमंञी अदरणीय के चंद्रशेखर राव यांनी दिली आहे .त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांना कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन अकोला पूर्व भारत राष्ट्र समिती यांच्यावतीने महाराष्ट्र शासनाला केले आहे. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले शेतकरी परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्र राज्यात म्हणून अब की बार कीसान सरकार ,आल्याशिवाय राहणार नाही. भारत राष्ट्र समिती प्रमुख व तेलंगाना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना शेतकऱ्यांची काळजी घेणारा मुख्यमंत्री  का? म्हणतात याचा प्रत्यय आज पुन्हा संपूर्ण देशाला त्यांच्या निर्णयातुन स्पष्ट झाला आहे. मा.श्री. के.सी.आर साहेबांनी ३ ऑगस्टपासून शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा मध्ये शेतकऱ्यांना आधीच देण्यात आलेल्या कर्जमाफीसोबतच आणखी १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येत आहे.असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. रयथू बंधूप्रमाणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम महिन्याच्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री मा.श्री. केसीआर साहेब यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारने आतातरी साहेबांकडून प्रेरणा, मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी व शेतकरी आत्महत्या थांबाव्यात हीच अपेक्षा महाराष्ट्रतिल शेतकऱ्यांची असून ती मागणी महाराष्ट्र शासनाने त्वरित पूर्ण करावी असे आवाहन गजानन हरणे ,समन्वयक अकोला पूर्व भारत राष्ट्र समितीच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.      

    Post Views:  172


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted