10 मार्चला एकल महिला परिषद व परिचय मेळाव्याचे आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Mar 2025, 12:04 PM
   

अकोला - एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद व परिचय मेळावा महिला व बाल विकास विभाग अकोला, माणस फाउंडेशन, सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला,एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 
जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिला परिषद व परिचय मेळावा निमित्य समस्या, विवंचना, सक्षमीकरण, शासन योजना, पुनर्वसन आदी विषयांवर तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली जाणार  आहेत. सदर मेळाव्याचे आयोजन  दिनांक 10 मार्च 2025 सोमवारला सकाळी 11.30 वा जानोरकर मंगल कार्यालय, रिंग रोड कौलखेड अकोला येथे  करण्यात आले असून या मेळाव्याचे उ‌द्घाटक मा.श्री. अजित कुंभार जिल्हाधिकारी, अकोला यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी मा. बी. वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला राहणार आहेत. या मेळाव्याची संकल्पना मा. श्री दत्तात्रय श्रीरामजी लहाने, मानस फाऊंडेशन बुलढाणा यांची असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. गिरीश पुसदकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अकोला,मा. राजश्री कोलखेडे (सोनखासकर)जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प. अकोला, मा. आरती टाकळकर सामाजिक कार्यकर्त्या राहणार आहेत. एकल महिला परिषद व परिचय मेळावाला विशेष सहकार्य व मार्गदर्शन मा. श्री. नरेश मानकर ,मा. डॉ. नेहा मानकर, मा. प्रा. शिवराम बावस्कर, मा. श्री. गजानन हरणे समाजसेवक, मा. श्री. राजू लाडूलकर (डी.सी.पी.यु.), मा. श्री. सुनील लाडूलकर, मा. अॅड. जितेंद्र बगाटे ,मा. श्री. सुनिलभाऊ वनारे ,मा. श्रीमती रुपाली पांडे (जिल्हा संरक्षण अधिकारी) यांचे लाभणार आहे.एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद (विधवा, परितक्त्या, घटस्फोटित) व परिचय मेळाव्याचे आयोजन महिलांना सक्षम बनवणे या दृष्टीने आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे.सदर परिषदेचा मुख्य उद्देश विधवा, घटस्फोटित महिलांना स्वाभिमान जागृत करून त्यांना सक्षम बनवण्या करता सहकार्य करणे,रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. आत्मनिर्भर होण्याकरता समुपदेशन करणे,शासकीय योजनांची माहिती करून देणे,
समाजात मूल असणाऱ्या महिलांनी पुनर्विवाह करू नये, असा समज प्रचलित आहे. तरी सामाजिक पुनः एकात्मिकरणं आणि पारिवारिक सुरक्षित आधार मिळण्याच्या दृष्टीने पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहीत करणे आदी उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या एकल महिला परिषद व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने तुषार हांडे, महेंद्र गणोदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

    Post Views:  63


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व