बोईसर मंगलमूर्ती नगर मध्ये २९ मे रोजी होणार श्री कुलस्वामिनी मातेच्या नवीन मंदिराचा जिर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठापणा सोहळा!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 May 2023, 10:10 AM
बोईसर - आज २७ मे रोजी संखे पाटील कुटुंबियांचे श्री कुलस्वामिनी मंदिराच्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित आज महिषासुरमर्दिनी मातेची भव्य पालखी व मिरवणूक ढोल ताशाच्या व डीजेच्या गजरात , फटाक्यांची आतषबाजी करत , भक्तगण नृत्य करत मंगलमूर्ती नगर ते बोईसर स्टेशन मार्गे भंडारवाडा पासून पुन्हा श्री कुलस्वामिनी मंदिर,मंगलमूर्ती कडे संपन्न झाली. मातेची मिरवणूक बोईसर स्टेशन लगत असलेले श्री कामतेश्वर मंदिरात पालखी फिरवण्यात आली.
रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ते १० वाजेपासून श्री गणेश पूजन, स्वास्तिक पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, कर्मदेवता स्थापन , नवग्रह हवन, आरती अशी कार्यक्रमाची रूपरेषा असून २९,मे रोजी सकाळी ९ ते १० स्थापित देवतांचे प्रातः पुजन, मूर्तीला दशविध स्नान, शालाकर्म, ध्वजारोहण, कलशारोहण, मूर्तीची स्थिर लग्नावर अचल प्रतिष्ठापना, मंगलाष्टक पठण, प्रधान हवन, स्थापित देवतांचे हवन, बलिदान महाआरती, दुपारी २ ते ३ च्या दरम्यान महाप्रसाद (भंडारा) नंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
दिनांक २८ व २९ मे रोजी श्री कुलस्वामिनी मातेच्या मंदिराचा जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व माता प्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार असून या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, भक्तगण, हितचिंतक, मित्रमंडळी व नातेवाईकांना जाहीर निमंत्रण, निमंत्रक श्री कुलस्वामिनी माता मंदिर बोईसर चे अध्यक्ष व संस्थापक निलम संखे व संखे - पाटील समिति बोईसर, यांनी दिले आहे.
Post Views: 309