15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अंध दिन - पांढरी काठी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.डोळ्यावर काळा चष्मा अन् हातात पांढरी काठी घेऊन रस्ता ओलांडणारे चालत्या रेल्वेत खेळणी विकणारे अंध बांधव आपण पाहतो.त्यांच्या हातातली वरचा भाग लाल व खालच्या बाजूला पांढरी असलेली काठी ही पांढरी काठी आता यांची जीवन रेखा म्हणून राहिली आहे. अंध बांधवांना अंध:कारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी पांढरी काठी हि नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या समाजसेवी संस्थेने बहाल केली आहे.समाजाला एक प्रकारे हि पांढरी काठी संदेश देत असते.अंध बांधवांचा खचलेला आत्मविश्वास या पांढरी काठीने वाढविला आहे. आता तर ती त्यांची आयुष्याची साथीदार झाली आहे .6 ऑक्टोबर 1964 हा दिवस पांढरी काठी सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला, आणि जगभरातल्या बहुतेक देशांनी आपापले स्वतंत्र कायदे करून पांढऱ्या काठीला अंधांची आयडेण्टिटी म्हणून मान्यता दिली.पांढर्या काठीच्या आधारावर जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध बांधवांना आज दया किंवा सहानुभूतीची नाही तर संधीची गरज आहे. ही संधी आपण देऊ शकता दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला एनजीओ मार्फत दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार आरोग्यासाठी ही संस्था संपूर्ण भारतभर कार्य करीत आहे.आपण सुद्धा आपल्या वाढदिवसाला व शुभ प्रसंगी फक्त 365 रुपये देऊन मदत करू शकता. एका अंध व्यक्तीला ही पांढरी काठी भेट म्हणून देऊ शकता.ज्याद्वारे तो दिव्यांग व्यक्ती स्वयंपूर्ण होऊ शकतो.त्याकरता गुगल पे व फोन पे क्रमांक आहे ९४२३६५००९० ह्या क्रमांकावर आपली सहायता निधी जगाच्या कोणत्याही भागातून पाठवू शकता.अधिक माहिती करीता आपण दिलेल्या नंबरवर ,दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या फेसबुक, इंस्टाग्राम व युट्यूब चॅनल वर मिळवू शकता* धन्यवाद!
लेखक-प्रा.विशाल विजय कोरडे
(संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला,
सहायक प्राध्यापक-शिवाजी महाविद्यालय अकोला) ९४२३६५००९०
Post Views: 208