लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुखकडून पल गांधीचा सत्कार..!


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-07-13
   

बुलढाणा - माध्यमिक शालांत आणि स्पर्धा  परिक्षेत १०० टक्क्यांच्या आसपास गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचे  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून  कौतुक करून त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांनी मिळविलेले नेत्रदिपक यश हे त्यांचे आई वडील आणि परिवाराप्रमाणेच समाजासाठी सुध्दा अभिमानास्पद आहे.त्यामुळे ही सामाजिक बांधिलकी जोपासत  पत्रकार महासंघाकडून काही विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.या उपक्रमांतर्गत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे  बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख यांनी संग्रामपूर तालूक्यात वानखेड येथील कु.पल गणेश गांधी या विद्यार्थिनीला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन  सन्मानित करीत तिच्या यशाचे कौतुक केले.   
    गुणवत्ताप्राप्त पाल्ल्यांच्या यशाचे कौतुक आणि शुभेच्छा म्हणून , सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन लोकस्वातंत्र्य प्रकार महासंघाकडून अनेक विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रमाणेच वानखेड मध्ये स्वप्निल देशमुख यांनी पल गांधी हिला सन्मानित केले.

    Post Views:  188


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व