आस्थापना नोंदणी व नियंत्रण विभागाकडून किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान


विटांच्या भट्टी वरून ३ बालकामगारांची मुक्तता
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Mar 2025, 12:13 PM
   

अकोला - अमरावती विभागाचे कामगार उपायुक्त  नितीन पाटणकर साहेब, यांचे निर्देशानुसार  राहुल काळे, सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला  यांच्या मार्गदर्शनात बाल व किशोरवयीन कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम १९८६ व सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान नुकतेच राबविण्यात आले. ही कार्यवाही  श्रीमती योगिता मालोकार दुकाने निरीक्षक श्रेणी २ अकोला यांचे नेतृत्वात  किरण राठोड दुकाने निरीक्षक अकोला व अमर  खेतकडे दुकाने निरीक्षक श्रेणी २ कुमारी अर्चना कांबळे दुकाने निरीक्षक अकोला व श्री रोहित भाकरे बालक प्रतिनिधी, यांनी संयुक्तपणे कार्यवाही केली.  सदर कार्यवाहीत विटाभट्टी आस्थापनेतून  ३बाल कामगारांची  मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी मालक नसीर अहमद मंजूर अहमद यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बाळापूर येथे एफ आय आर दाखल करण्यात आला.
आवाहन
कोणत्याही आस्थापना धारकांनी बालकामगार कामावर ठेऊ नये , तसे  आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशन मध्ये याबाबत रितसर तक्रार करावी. असे आवाहन विनोद जोशी दुकाने निरीक्षक, श्रेणी १,  अकोला यांनी केले आहे.

    Post Views:  135


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted