वऱ्हाड विकास संस्थेतर्फे महिला दिन साजरा मनीषा भुजाडे यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित
अकोला : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन 8 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6.30वाजता करण्यात आले.
वऱ्हाड विकास संस्था खडकी अकोलाचे अध्यक्ष पंजाबराव वर यांचे वतीने जागतिक महिला दिन उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी परिसतातील कर्तृत्ववान महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी समृद्धी महिला गटाच्या सचिव महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लघु उद्योग करता यावा म्हणून सतत प्रयत्नशील आसण्याऱ्या मनीषा भुजाडे यांना नारी शक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष से. नी. तहसीलदार तेलगोटे होते तर यावेळी कल्पना भटकर, मीनाक्षी शेगोकार, विद्या अंभोरे, जया झिने, वृषाली डिनकुटवार, नारी लालकारच्या कार्यकारी संपादक सुनंदाताई वर यांनाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला!!!
कार्यक्रमाचे संचालन संस्थाध्यक्ष पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश झिने याने मानले.
Post Views: 126