अकोला जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात एल.आर.टी. कॉलेजच्या एन.सी.सी. कॅडेट्सचा गौरव


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Oct 2026, 10:01 AM
   

महात्मा गांधी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून अकोला जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सव समिती व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे आयोजित भव्य पावनखिंड दौड (१० कि.मी. मॅरेथॉन) स्पर्धेत श्रीमती एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला येथील एन.सी.सी. युनिटच्या ३० कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दि. २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान “खेळूया... गाजवूया... अकोल्याचा मान वाढवूया!” या ब्रीदवाक्याखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पावनखिंड दौडीत ३ कि.मी. अंडर-१८ आणि १० कि.मी. ओपन अशा दोन गटांचा समावेश होता. एन.सी.सी. कॅडेट्सनी या दौडीत शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्तीचे दर्शन घडवत मोठ्या क्रीडाभावनेने सहभाग नोंदविला. या दौडीत सहभागी झालेल्या एन.सी.सी. कॅडेट्समध्ये पल्लवी सिरसाट, दिव्या बावस्कर, तृष्णा सिंग, जानवी पारसकर, किट्टू पटेल, नियती खांडेकर, गुंजन खांडेकर, वैष्णवी बिचारे, वैष्णवी हरसूलकर, वैष्णवी वानखडे, सानिका भरकर, अर्पिता जाधव, कोमल इंगळे, कोमल गावंडे, श्रुती तिडके, अविनाश वाकोडे, आदित्य टाले, निखिल मोर्या, वैभव काळपांडे, धनराज जाहीर, डेव्हिड नरेटी, आवेश परसुवाले, जफूर परसुवाले, ओम काळे, अंश तिवारी, सम्राट शेगोकार, भावेश दहिवाले आणि सुमित मिश्रा यांचा समावेश होता. या उल्लेखनीय सहभागाबद्दल महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे आणि एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल म. तिरकर यांच्या हस्ते सर्व सहभागी कॅडेट्सचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील डॉ. महेश डाबरे, डॉ. योगेश अग्रवाल, डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. निलेश चोटिया, डॉ. नागनाथ गुट्टे, प्रा. राजू क्षीरसागर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कॅडेट्सच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, सहसचिव अमितजी सुरेका तसेच समस्त कार्यकारिणी सदस्यांनी एन.सी.सी. कॅडेट्सचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व