लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन
अकोला : अकोल्यातून स्थापन झालेल्या अखिल भारतीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सुबक आणि आकर्षक अशा २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अकोला येथील जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींदजी दुसाने यांचे हस्ते काल संपन्न झाले.
पत्रकार संघटनकार्याची सुरूवातच ज्या प्रेरक अधिष्ठाणापासून करण्यात आली त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.राजाभाऊ देशमुख यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुप्रसिध्द साहित्त्यिक,कवी सुरेश पाचकवडे,बार असोशिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, धैर्यशील शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंदा देशमुख,अ.भा.गुरूदेव सेवामंडळ गुरूकुंजचे केन्द्रीय पदाधिकारी भानुदास कराळे,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व्यासपीठावर व्यसपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रसंतांना हारार्पण आणि वंदन करण्यात आले. अकोल्यातील जेष्ठ पत्रकार स्व.लक्ष्मण हागे व जेष्ठ पत्रकार आणि प्रिन्टीग व्यवसायिकांच्या महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक स्व. बालमुकूंदजी अग्रवाल या निधन झालेल्या दोन पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित प्रमुख अतिथींचे याप्रसंगी ग्रामगीता आणि पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकातून संजय देशमुख यांनी पत्रकार कल्याण आणि सामाजिक कार्य या संयुक्त संकल्पनेने संघटना करीत असलेल्या विधायक वाटचालीची माहिती देऊन सामाजिक उपक्रमाच्या आर्थिक सहकार्यार्थ दिनदर्शिकेला जाहिरातरूपाने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व जाहिरातदार व हितचिंतकांचे आभार मानले.प्रमुख भाषणातून डॉ.मिलींदजी दुसाने यांनी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिका प्रकाशनातील सामाजिक उध्देशाप्रती समाधान दर्शविले व पुढील वर्षी अधिक उद्बोधक मार्गदर्शक माहिती समाविष्ट करण्याची अपेक्षा ठेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.उपस्थित वक्त्यांनी व अध्यक्षिय भाषणातून प्रा.राजाभाऊ देशमुख यांनीही पत्रकार महासंघांच्या विधायक अभिनव वाटचालीवर प्रकाश टाकून शुभेच्छा प्रगट केल्या.
या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे, सचिव राजेन्द्र देशमुख, सौ.जया भारती, संदिप देशमुख, अंबादास तल्हार, सिध्देश्वर देशमुख, जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर, सागर लोडम, दिपक देशपांडे, सुरेश कुलकर्णी, डॉ. अनुपकुमार राठी, माजी. ज्युडी. मॅजि. ऍड. नितीन अग्रवाल, मंगेश चऱ्हाटे, दिलीप नवले, मधुकरराव देशमुख, कृष्णराव एम.देशमुख, निर्माण ग्रूपचे विठ्ठलराव देशमुख, जे.पी.खोटरे, दिपकराव आखरे, सुरेशराव ठाकरे, सजय केवट, अरूण पाटील, सुनिल दोड व बहूसंख्य हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. जया भारती यांनी तर आभारप्रदर्शन केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.
Post Views: 457