श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत ईंग्लिश स्टोरी टेलिंग कॉम्पिटीशन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Feb 2025, 9:11 AM
अकोला - माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशन आणि शिवाजी विद्यालय शहर शाखा हरिहर पेठ अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 10 2 2025 रोजी श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला येथे इंग्लिश लँग्वेज स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन ही जिल्हास्तरावरील स्पर्धा संपन्न होत आहे. ही स्पर्धा आधी आठ गटांमध्ये तालुकास्तरावर राबविण्यात आली. यामध्ये पाच ते सात आणि आठ ते दहा असे दोन गट होते. दोन्हीही गटातून एकंदरीत 32 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. या निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी दिनांक दहा तारखेला शिवाजी विद्यालयांमध्ये संपन्न होत आहे. या स्पर्धेकरिता प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर सुचिता पाटेकर,माननीय श्री प्रकाशजी अंधारे शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डी बी म्हैसने फाउंडर प्रेसिडेंट मेटा, मनोज देशमुख मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला, अनंत मसने, डिस्टिक प्रेसिडेंट मेटा, बलवंत गावंडे, डिव्हिजनल व्हाईस प्रेसिडेंट, महेंद्र कराळे डिव्हिजनल व्हाईस प्रेसिडेंट, विनय दराडे, मनोज बोचरे, ज्योती इंगळे विभागीय उपाध्यक्षा,अजय काळे, व्हाईस प्रेसिडेंट, अनिल धोत्रे आणि इतर सर्व इंग्रजी टीचर्स असोसिएशनचे तालुका, जिल्हा व राज्य पदाधिकारी या स्पर्धेकरिता उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीने स्पर्धकांची आगळीवेगळी स्टोरी टेलिंग स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेला पालकांनी इंग्रजी प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज देशमुख यांनी केले आहे.
Post Views: 137