शिवाजी विद्यालय शहर शाखेत डॉ.पंजाबराव देशमुख पुण्यतिथी साजरी


 विश्व प्रभात  11 Apr 2024, 10:05 AM
   

अकोला ---स्थानिक श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला येथे दि.१० एप्रिल रोजी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.एम.बी.देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे शिक्षक प्रतिनिधी के.बी.तायडे  होते.जेष्ठ शिक्षक म्हणून श्रीमती मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण  करण्यात आले. ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले. डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनकार्यावर कु . अक्षरा संजय इंगळे व कु.आराध्या संजय इंगळे यांची प्रकाश टाकणारी भाषणे झाली. शिक्षक प्रतिनिधी श्री.के. बी. तायडे यांनीही मनोगत व्यक्त केले.शेवटी  मुख्याध्यापक मा. श्री.मनोज देशमुख  यांचे अध्यक्षिय भाषण झाले.
      कार्यक्रमाचे संचालन व आभार सौ.प्रतिभा कराळे यांनी केले.या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

    Post Views:  111


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व