संजय शेळके करणार उद्या प्रचाराचा शुभारंभ


 जिल्हा प्रतिनिधी : वैभव हराळ  07 Nov 2024, 5:57 PM
   

 मनसेचे अधिकृत उमेदवार संजय शेळके उद्या दिनांक ७ नोव्हेंबर रोजी तांदळी दुमाला येथे श्री तांदळेश्वर देवस्थानामध्ये नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.


तांदळी गावातील सर्व ग्रामस्थांना या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “गरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत,” असे सांगत शेळके यांनी आपल्या उद्दिष्टाची जाहीरात केली आहे. त्यांचा पक्ष सामाजिक न्यायासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी कटिबद्ध आहे.

संजय शेळके म्हणाले, “सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी राजकारणात उतरण्याचा आमचा संकल्प आहे. निवडणूक लागली तर ठीक, न लागली तर त्याबद्दल चिंता नाही. आमचं ध्येय स्पष्ट आहे – समाजाला योग्य दिशा देणे.” त्यांनी म्हटले आहे की, पैसे व बलाढ्य साधनांवर आधारीत राजकारण करू नये, कारण अशा प्रकारात राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्याचे प्रकार होत आहेत.

सध्या राज्यात आमदारकीच्या तिकिटांसाठी पक्ष बदलण्याचे प्रकार सुरु आहेत. “पक्ष बदलणे, रस्ते मंजूर करण्याच्या बदल्यात टक्केवारी घेणे, टोल नाक्यांची निर्मिती करून सामान्यांच्या वाहन खरेदीवर वाढीव कर लादणे, शेतीवरील कर – हे सर्व प्रकार पाहता राजकीय नेतृत्वाची भूमिका दुर्दैवी ठरली आहे,” असे शेळके यांनी ठणकावले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील मराठा आमदारांचा विरोध आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

संजय शेळके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा आधार घेतला आहे. “जर मराठा समाजाला खरेच आरक्षण हवे असेल तर मनसेचेही आमदार निवडून येणे अत्यावश्यक आहे,” असे शेळके यांनी सांगितले. शेवटी त्यांनी जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र असे उद्गार काढले आणि मनसे सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष वैभव हराळ यांनी संपूर्ण परिसरातील मनसे कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

    Post Views:  132


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व