आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयात ध्वजारोहण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Jan 2023, 10:11 AM
   

तेल्हारा : 26 जानेवारी या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयात ध्वजारोहण विद्यालयाचे श्री पुरूषोत्तम इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद गिर्हे सर होते. प्रमुख अतिथी शिवराजे जामोदे कविराज, अरूण काळे, अमित गिर्हे,  कु पायल महाले ,गणेश  नागळे, शामराव चिकटे, विठ्ठल महाले, नंदकिशोर महाले, वानखडे यांची होती. या प्रसंगी मुख्याध्यापक गिर्हे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
        प्रजासत्ताक दिनी प्रभात फेरी काढण्यात आली. प्रजासत्ताक दिन चिराऊ हो, भारत माता की जय अश्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. वर्ग नहू मधिल विद्यार्थ्यांनी कु त्रिशा राहूल तायडे ने भारत मातेची आकर्षक वेशभूषा करून सर्वांना जिंकून घेतले. ध्वजारोहण समारंभानंतर वर्ग 8,9,व10 च्या विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम साजरे झाले. वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, यावेळी घेण्यात आल्या, स्कॉलरशिप, नेहरू युवा मंडळाची कबड्डी व चित्रकला स्पर्धेतील तसेच वर्ग पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पदक, पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद गिर्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक सोहळ्याचे तसेच सांस्कृतिक सोहळ्याचे संचालन अनुक्रमे आमित गिर्हे, शिवराजे जामोदे, कु पायल महाले यांनी केले. आभार अरूण काळे सर यांनी मानलेत.

    Post Views:  206


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व