आकोट-आकोला रोड त्वरीत पूर्ण करून गोपालखेड पुर्णा पूलावरुन वाहतुक सुरु करावी....अन्यथा तिव्र आंदोलन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Jun 2023, 6:30 PM
आकोट - देवरी,ता.आकोट येथे दि.23 रोजी पुरुषोत्तम चितलांगे यांचे अध्यक्षेखाली ग्राम कृति समितीची बैठक होउन आकोट ते आकोला रोड चे काम 7-8 वर्षापासून सुरु असून अपूर्ण आहे, त्यामुळे शेकडो अपघात झालेत, प्रवाश्यांचे हातपाय तुटले त,मृत्यू झालेत,संबंधित कंपनीवर कार्यवाही व नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ही कंपनी काल्या यादीत टाकल्या जावी.
तसेच पूर्णा नदीवरील गोपालखेड पूल व रस्ता तातडीने जिल्हा प्रशासनाने सुरु करावा, अन्यथा ति्व्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुषंगाने आज दि.23 जून रोजी आकोट उपविभागीय अधिकारी श्री. बलवंतराव अरखराव यांना श्री. महादेवराव लांजूडकर, सचिव, ग्राम समिती,देवरी तथा कार्यकर्ता गुरुदेव सेवा मंडल, यांचे हस्ते श्री. अविनाश पोटदुखे,नायब तहसिलदार आकोट यांचे हस्ते शेतकरी बचाओ आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत, श्री.रामदास मंगळे,संघटक, पंजाबराव पाचपाटील, सामाजिक कार्यकर्ते, श्री.संजय आठवले,यांच हस्ते दिले पुरुषोत्तम पोटे, रामदास वाघाडे,वासुदेव परनाटे, महादेवराव गावंडे,बंडूभाऊ पडोले, तालुक्यातील नागरीकांनी निवेदनावर स्वाक्षरी करुन समर्थन केले.
Post Views: 81