विशाल बोरे : आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
पुणे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये सन्मान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
09 Jan 2025, 8:27 AM
अकोला: भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान व भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित पहील्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीव्हलमधे मानाच्या आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्काराने दूरदर्शन वृत्तप्रतिनिधी तथा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे वृत्तप्रतिनिधी विशाल प्रभाकर बोरे यांना भिडेवाडाकार विजय वडवेराव व सावित्रीमाई फुले यांचे वंशज डॉ.नेवसे पाटील यांच्या हस्ते
पुणे येथे सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून विशाल बोरे यांनी प्रेरणादायी,सकारात्मक विषयांना राष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे.तसेच भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर 2013 पासुन सातत्यपूर्ण लिखाण केले आहे.याची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
यापूर्वीही बोरे यांना मुकनायक पक्षिकाचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर स्मृती मूकनायक पत्रकारिता पुरस्कार, राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेचा दर्पण आदर्श पत्रकारिता पुरस्कार, युथ आयकॉन पुरस्कार,कविवर्य जगदीश खेबुडकर युवासाहीत्य राज्य पुरस्कार,संताजी साहित्य, कला राज्य पुरस्कार,शब्दशोध साहीत्य पुरस्कार,महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा राष्ट्रीय काव्यसाधना पुरस्कार, काव्यगौरव साहीत्य पुरस्कार,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा छत्रपती संभाजीराजे राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, दैनिक लोकशाही वार्ताचा अकोलारत्न, पुरस्कारासह विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
Post Views: 116