शिवराजे जामोदे कविराज यांच्या कवितेचे प्रकाशन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 May 2022, 5:10 PM
   

तेल्हारा : आडसूल येथिल मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयामध्ये  1 मे या महाराष्ट्र दिनी शिवराजे जामोदे कविराज यांच्या चला जग जिंकुया या कवितेचे प्रकाशन आर्ट ऑफ लिव्हिंग चे विदर्भ समन्वयक आकोट येथील रमेश पुंडकर यांच्या हस्ते  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद गिर्हे होते. प्रमुख उपस्थिती अरूण काळे सर, सौ. सुनिता गिर्हे मॅडम, अमित गिर्हे सर, पुरूषोत्तम इंगोले, गणेश नागळे, विठ्ठलराव महाले यांची होती. 
          कर्णा सारखे दाणी व्हावे  
          शिवाजी सारखे विर 
          लक्ष भेदण्या करिता 
          व्हावे अर्जुनाचा तिर 
या सारख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या काव्य ओळी कवितेमध्ये   गुंफलेल्या आहेत. महाराष्ट्र दिन वर्धापनदिनाचे औचित्य साधून तसेच शैक्षणिक सत्राचा शेवट या अनुषंगाने कवितेचा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना  कविता भेट देण्यात आली. कवितेचे साभिनय, ओजश्वी वाचन शिवराजे जामोदे यांनी करून उपस्थितांना जिंकले. कार्यक्रमाचे संचालन सौ. सुनिता गिर्हे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन अमित गिर्हे सर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुरूषोत्तम इंगोले, गणेशराव नागळे, विठ्ठल महाले, नंदकिशोर महाले यांनी अथक प्रयत्न केले.

    Post Views:  409


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व